महाराष्ट्र शासनाने दि. 01 फेब्रुवारी 2023 ते दि. 31 मार्च 2023 या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना रु. 350/- प्रति क्विंटलप्रमाणे कांदा अनुदान जाहिर केलेले आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पुर्तता करुन दि.03/04/2023 ते दि.20/04/2023 पर्यंत कांदा अनुदान अर्ज बाजार समितीकडे सादर करावे.
------------------------------------------
1.बाजार समितीकडील विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावा.(सदरचा अर्ज बाजार समितीचे मुख्य कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.)
2. कांदा विक्रीची मूळ हिशोबपावती.
3. कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 उतारा.
4. बॅंक पासबुकाच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत (खातेक्रमांक व IFSC Code सह)
5. आधारकार्डची झेरॉक्स प्रत.
6. ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडीलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटूंबियांच्या नावे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र.
---------------------------------------------
टिप- ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडीलांचे नांवे व विक्रीपट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटूंबियांच्या नांवे आहे, तसेच 7/12 उता-यावर पिक पाहणीची नोंद आहे, अशा प्रकरणात वडील, मुलगा वा कुटूंबिय यांनी सहमतीचे शपथपत्र अर्जा सोबत जोडावे. या बाबत 7/12 उतारा ज्यांचे नांवे असेल, त्यांच्या बॅंक खात्यात अनुदान रक्कम जमा केली जाईल.
0 Comments